आपण कधी विचार केला आहे का?
कायदेशीर भाषेत, एक आपत्ती जी पूर्णपणे निसर्गाच्या शक्तीमुळे होते आणि यथार्थपणे रोखता येत नाही,
ती देवाचे कार्य म्हणून संबोधले जाते. हा वाक्यांश बहुतेकदा विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जातो. आपल्या जगात घडणार्या वाईट गोष्टींसाठी देव जबाबदार आहे ही कल्पना आम्हाला कोठे मिळाली?
तो नैसर्गिक आपत्ती निर्माण करतो का? काय तो मनमानेपणे ठरवतो कि ,भूकंप, चक्रीवादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती कुठे आणि कधी घडावी? देव या गोष्टी घडवून आणण्यासाठी काहीतरी करतो का? त्या आणण्यासाठी तो नैसर्गिक जगामध्ये फेरफार करतो का? आणि नाही, तर तो ह्या जगात होणारा त्रास टाळण्यासाठी अधिक का करत नाही? शेवटी,बायबल मध्ये आपण वाचलेल्या हिंसाचाराला देव जबाबदार होता का? त्याने स्वतः हिंसाचाराचा अवलंब केला का? बायबल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते, पण ती शोधण्यासाठी आपल्याला पृष्ठभागाच्या खाली पाहण्याची आवश्यकता आहे. जरी ती आपल्या विश्वास प्रणालीला हादरवून टाकते, तरी पण , पुष्कळांचा असा विश्वास आहे की आपण देवाच्या आज्ञांचे अनुसरण करतो तेव्हा देव आपल्यावर प्रेम करतो, पण जे लोक आज्ञा पाळत नाहीत व देवाच्या इच्छेविरुद्ध वागतात त्यामुळे देवाला अशा व्यक्तीचा राग येतो आणि त्या लोकांन देव शिक्षा करतो. या अभ्यासाचा मुख्य उद्देश्य पवित्रशस्त्रामधून हे दर्शविणे आहे कि देवाने कधीच विनाशक म्हणून काम केले नाही परंतु केवळ एक निर्माता, संभाळकर्ता आणि तारणहार म्हणूनच काम केले आहे.
पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. - याकोब 3:17